Friendship Day Bands: फ्रेंडशिप डेची धूम! एलईडी, मेटल आणि मॅग्नेटिक बँडची बाजारात मोठी मागणी

आकर्षक फ्रेंडशिप बँड बाजारात
Friendship Day Bands
Friendship Day BandsPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्रीदिन साजरा केला जातो. येत्या २ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. बाजारात यंदा एलईडी, मेटल, चार्म, मॅग्नेटिक, इकोफ्रेंडली अशा नावीन्यपूर्ण फ्रेंडशिप बँडची चलती आहे.

बाजारात अवघ्या १० पासून ते 500 रुपयांपर्यंत विविध प्रकारचे बँड उपलब्ध आहेत. रेशमी, कापडी, रबर, प्लॅस्टिकचे, शुभेच्छा लिहिलेले रबरी बँड, बांगडीच्या आकारातील बँड, चौकोनी व गोल मण्यामधील बँड, ब्रेसलेटचे आकार असलेले असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

मेटलचे बँड : यामध्ये मेटलचा वापर करून एखाद्या बांगडीप्रमाणे किंवा कड्याप्रमाणे याला आकार दिला जातो. या बँडची किंमत 50 रुपयांपासून आहे. अनेक तरुण-तरुणी मेटलचे बॅंड खरेदी करताना दिसत आहेत.

ब्रेसलेटसारखे बँड : हे बँड कुंदन, मणी आणि स्टोन वापरून तयार केलेले आहेत. त्यामुळे दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. हे बँड इतरही दिवशी फक्त ब्रेसलेट म्हणूनही वापरता येतात.

Friendship Day Bands
Moshi Garbage Depot Investigation: मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन

लेदरचे बँड : लेदर आणि दोरा वापरून बनविलेले हे बँड खूपच खास आणि रिच लूक देतात. हे अ‍ॅडस्टेबल असतात. त्यामुळे त्याला कमी किंवा जास्त करण्याचा पर्यास असतो. हेदेखील बँड इतरही दिवशी वापरता येतात.

रिबन बँड आणि अंगठी : रिबन बँड आणि अंगठी हे बँड खूप वर्षांपासून चालत आलेले आहेत. यांना सध्या मागणी कमी असली तरी बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांची यामध्ये खूप चलती आहे.

मणी व रंगबेरंगी धाग्यांचा फ्रेंडशिप बँड : मणी आणि रंगबेरंगी धाग्यापासून बनविलेले फ्रेंडशिप बँड हे डझनावर उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व मित्र-मैत्रिणांना एकसारखा पर्याय म्हणून हे बँड खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल दिसत आहे.

एलईडी लाइट असलेल्या बँडला तरुणांची पसंती

या वर्षी शालेय विद्यार्थी व तरुणाईमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा विशेष उत्साह दिसून येत आहे. फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री अबाधित ठेवण्याबरोबरच ती अतुट राहिल असा विश्वासही यानिमित्त व्यक्त केला जातो.

Friendship Day Bands
Fake Government Job Scam: सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची लूट

यानिमित्त फ्रेंडशिप बँडचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असून, खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होत आहे. नाव प्लस हार्ट किंवा बेस्ट फ्रेंड लिहिलेले बँड २० ते ८० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.

मॅग्नेटिक किंवा ब्रेसलेट स्टाईल 2 भाग असलेले बॅंड १०० ते २५० रुपयांपर्यंत मिळतात. इको-फ्रेंडली सात रंगाच्या धाग्यांमध्ये हाताने विणलेले बँड १० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. एलईडी लाइट असलेले रात्री चमकणारे बँड १२० ते २०० पर्यंत मिळत असल्यामुळे ते खरेदी करण्याकडे तरुणांचा ओढा दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news