Chikhli Police Stone Pelting: चिखलीत धार्मिक स्थळांवरील कारवाईदरम्यान तणाव; पोलिसांवर दगडफेक, 8 ते 10 कर्मचारी जखमी

महापालिकेच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला विरोध; 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात
Chikhli Police Stone Pelting
Chikhli Police Stone PeltingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर सोमवारी (दि. ८) रात्री करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत आठ ते दहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Chikhli Police Stone Pelting
Tandoor Bhatti Demand: पिंपरीत तंदूर भट्ट्यांची मागणी वाढली; गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायाचा कल बदलला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई सुरू होती. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Chikhli Police Stone Pelting
Pimpri Free Textbook Distribution: पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप सुरू; 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना लाभ

सुमारे ५०० पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. कारवाई सुरू असताना मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संबंधित समाजाकडून कारवाईला तीव्र विरोध करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

Chikhli Police Stone Pelting
ACB Bribe Case Talathi: चऱ्होली बुद्रुकमध्ये एसीबीचा सापळा; तलाठी आणि खासगी व्यक्ती 70 हजारांच्या लाचेसह रंगेहात पकडले

दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता काही नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर परिस्थिती चिघळून जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही सांगण्यात येत आहे.

Chikhli Police Stone Pelting
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे समजते. घटनेनंतर चिखली परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news