ACB Bribe Case Talathi: चऱ्होली बुद्रुकमध्ये एसीबीचा सापळा; तलाठी आणि खासगी व्यक्ती 70 हजारांच्या लाचेसह रंगेहात पकडले

वारसनोंदीसाठी 1.80 लाखांची मागणी; तडजोडीनंतर 70 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई
ACB Bribe Case
ACB Bribe CasePudhari
Published on
Updated on

पिंपरी: वारसनोंद करून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चऱ्होली बुद्रुक येथील तलाठी आणि त्याच्या वतीने रक्कम स्वीकारणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (दि. ८) रंगेहात पकडले. ही कारवाई चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात करण्यात आली.

ACB Bribe Case
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चऱ्होली बुद्रुक (दि. हवेली) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सुनील भिकाजी सातोसे (४४) आणि खासगी व्यक्ती नेमाजी माधवराव भोकरे (४०) यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ACB Bribe Case
Lonavala Monsoon Delay: लोणावळ्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; उष्णतेने पर्यटक आणि शेतकरी दोघेही हैराण

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे चऱ्होली बुद्रुक येथे वडिलोपार्जित शेती असून, त्यांच्या निधनानंतर संबंधित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदारांचे वडील व काका यांची वारसनोंद करण्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये अर्ज करण्यात आला होता. मात्र, अनेकदा पाठपुरावा करूनही वारसनोंदीची कार्यवाही करण्यात आली नव्हती.

ACB Bribe Case
Nilu Phule Theatre Fire Safety: निळू फुले नाट्यगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणा दुरुस्त; पुढारी वृत्तानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

तक्रारदार २९ मे रोजी महसूल कार्यालयात चौकशीसाठी गेले असता तलाठी सुनील सातोसे यांनी वारसनोंद करून देण्यासाठी सुरुवातीला एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ८० हजार रुपयांवर आली. याप्रकरणी तक्रारदारांनी १ जून रोजी एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीने ४ जून रोजी पडताळणी केली असता तलाठी सातोसे यांनी ८० हजार रुपयांच्या मागणीवरून तडजोड करून ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम खासगी व्यक्ती नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचेही उघड झाले.

ACB Bribe Case
Pune Nagpur Bus Fare Hike: उन्हाळी सुट्ट्यांत ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; पुणे–नागपूर भाडे दुप्पट ते अडीच हजारांवर

त्यानुसार, एसीबीने सोमवारी सापळा रचला. चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात तक्रारदारांकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेमाजी भोकरे याला रंगेहात पकडण्यात आले. ही रक्कम तलाठी सुनील सातोसे यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे तपासात समोर आल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news