

चऱ्होली: श्री वाघेश्वर महाराजांचा यात्रोत्सव सोहळा चऱ्होली येथे उत्साहात पार पडला. या वेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा सोहळा झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रम व देवदर्शन झाले. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापासून दिनांक 16, 18 व 19 असे तीनही दिवस बैलगाडा शर्यत आणि दिनांक 17 रोजी कुस्तीचा आखाडा संपन्न झाला. चऱ्होलीतील बैलगाडा घाटात तीन दिवस मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहत बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.
तीन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यती बैलगाडा शौकिनांचे मुख्य आकर्षण ठरल्या. तब्बल 35 लाख रुपयांचा एकूण इनाम असणाऱ्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी म्हणजे 16 फेबुवारी रोजी प्रदीप टिंगरे आणि सचिन मुऱ्हे यांच्या जुगलबंदीला एक टू व्हीलर आणि चांदीची गदा बक्षीस म्हणून देऊन घाटाचा राजा किताब देण्यात आला. पहिल्या दिवशी वीस फुटाच्या बारीत सोहम गावडे यांना एक टू व्हीलर देण्यात आली.
पहिल्या दिवशीच्या फळीफोडमध्ये काळूराम ठोंबरे व संदीप पानसरे यांच्या बारीला जुम्पता गाडा, दुसर्ऱ्यात पहिला आलेल्या दीपक मुऱ्हे यांच्या गाड्याला एलईडी टीव्ही सेट, तिसऱ्यात पहिला आलेल्या कै. तानाजी गायकवाड यांच्या गाड्याला पाच हजार रुपये व चौथ्यात पहिला आलेल्या रामेश्वर सोनवणे यांच्या गाड्याला तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 18 फेबुवारी रोजी लक्ष्मण सस्ते यांच्या गाड्याला घाटाचा राजा किताब आणि एक टू व्हीलर आणि चांदीची गदा बक्षीस देण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या फळीफोडमध्ये दुर्योधन शिंगाडे आणि तुषार बुटके यांच्या जुगलबंदीला जुम्पता गाडा, दुसर्ऱ्यात पहिला आलेल्या प्रदीप खांदवे यांच्या गाड्याला एलईडी टीव्ही, तीसर्यात पहिला आलेल्या मोरा ग््रुाप बैलगाडा संघटना यांच्या गाड्याला रुपये पाच हजार आणि चौथ्यात पहिला आलेल्या आनंद गवारी यांच्या गाड्याला रुपये तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
बैलगाडा शर्यतीचे तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 19 फेबुवारीला रोहित जाधव आणि रवींद्र चव्हाण यांच्या जुगलबंदीला घाटाचा राजा किताब आणि टू व्हीलर व चांदीची गदा बक्षीस देण्यात आली. तिसऱ्या दिवशीच्या फळीफोडमध्ये नामदेव दरेकर व तेजस सातव यांच्या बारीला जुंपता गाडा, दुसर्ऱ्यात पहिला आलेल्या राजू निघोट यांच्या गाड्याला एलईडी टीव्ही, तिसर्यात पहिला आलेल्या अभय ठाकूर यांच्या गाड्याला रक्कम रुपये 5000 आणि चौथ्यात पहिला आलेल्या युवराज खांदवे यांच्या गाड्याला रुपये तीन हजार बक्षीस देण्यात आले. वाघेश्वर केशरी चऱ्होली हा किताब माऊली कृपा बैलगाडा संघटना यांना एक टू व्हीलर आणि चांदीची गदा देऊन करण्यात आला. बैलगाडा शर्यतीची सांगता करताना श्री वाघेश्वर महाराज स्वकाम सेवा मंडळ आणि चऱ्होली ग््राामस्थांतर्फे सर्व बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, प्रेक्षक, पाहुणेमंडळी तसेच बैलगाडा शर्यतीसाठी कष्ट घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.