Chakan Beer Bottle Attack: दारू पिऊन वाहन चालविण्यास मज्जाव; मित्रावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

चाकणमध्ये थरारक घटना; परस्पर विरोधात गुन्हे दाखल, दोघेही गंभीर जखमी
Crime.
Crime.Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: दारूच्या नशेत वाहन चालविण्यास मज्जाव केल्याने एका तरुणाने मित्रावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला. त्या वेळी मित्रानेही तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. याप्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चाकण येथील वैदुवाडी, बालाजीनगर येथील पार्किंग ग््रााऊंड जवळ घडली.

Crime.
Pune University Chowk Flyover: पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाची बाणेर मार्गिका लवकरच खुली

पहिल्या प्रकरणात नागेश बळीराम चिम रा. बालाजीनगर, वैदुवाडी, खेड) यांनी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन श्रीराम आरेकर (23, रा. बालाजीनगर, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत.

Crime.
Pradhan Mantri Awas Yojana PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा; 9 ठिकाणी 6,500 घरे

घटनेच्या वेळी आरोपीने जास्त दारू पिली होती, त्यामुळे फिर्यादीने त्याला ‌‘तू गाडी चालवू नको‌’ असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने ‌‘तू मला सांगणारा कोण? तुला जिवंत सोडणार नाही‌’, अशी धमकी दिली आणि कारमधील बिअरची बाटली काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली.

Crime.
Ajit Dada Statue Pimpri: भाऊसाहेब भोईरांचा अजितदादा पुतळा व पिंपरीतील नागरी समस्या यावर भाष्य

याच्या परस्पर विरोधात सचिन श्रीराम आरेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नागेश बळीराम चिम याला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन, नागेश आणि मित्र एकत्र दारू प्यायल्यानंतर सचिन आपली गाडी घेऊन जात असताना आरोपीने त्यांना हटकले. ‌‘तुला मस्ती आली आहे का, तुला जिवंत सोडत नाही‌‘ असे म्हणून आरोपीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.

Crime.
Pimpri Chinchwad Smart City Shutdown: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्प मार्च 2026 मध्ये बंद

फिर्यादीने डोके बाजूला केल्याने बाटली त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर लागली. यामध्ये फिर्यादीच्या हाताची शिर तुटल्याने त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण दक्षिण पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news