Ketan Agarwal Case: लोहगडावर चेतन चौधरी कडून केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रेशन

पोलीस अधीक्षकांनी उपस्थिती कडक बंदोबस्त
Ketan Agarwal Case
Ketan Agarwal CasePudhari
Published on
Updated on

लोणावळा: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया गोयल व चेतन चौधरी यांना 3 जुलै पर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर आज बुधवारी सकाळी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस मोठ्या बंदोबस्तात लोहगडावर दाखल झाले होते.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल व अन्य अधिकारी देखील गडावर हजर होते. 18 जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीमध्ये पडून मयत झाला होता. तपासात पुढे हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे निष्पन्न झाले होते.

Ketan Agarwal Case
Political News: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार; प्रशांत शितोळे यांचा इशारा

यानंतर या तपासाला कलाटणी मिळाली व तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. केतन अग्रवाल सोबत लोहगडावर गेलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिला याप्रकरणी मुख्य आरोपी करण्यात आले तर तीचा मित्र चेतन चौधरी याला देखील आरोपी करण्यात आले आहे.

दोघांनी मिळून हा हत्येचा कट रचत लोहगड किल्ला येथून केतनला दरीमध्ये धकलून दिले असल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. यानंतर ही घटना कशी घडली याचा सिन पुन्हा तयार करण्यात आला.

Ketan Agarwal Case
Sachin Ahir Net Worth: ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात गेलेल्या सचिन अहिरांची संपत्ती किती? आकडा वाचून बसेल धक्का

28 जून रोजी सिया ला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर गेले होते. 18 जून रोजी झालेला घटनाक्रम तिच्याकडून पुन्हा करून घेण्यात आला. आज 1 जुलै रोजी चेतना ला लोहगडावर पोलीस घेऊन गेले होते.

सिया ने दिलेली माहिती व चेतनच्या सीन रिक्रेशन मध्ये जुळते का याची उलट तपासणी यामध्ये करण्यात आली. सकाळी 11 वाजेपर्यंत लोहगड किल्ला नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सीन रिक्रेशन संपल्यानंतर सकाळी 11 वाजता किल्ला नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. लोहगडवरून चेतन चौधरी याला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news