Maharashtra Bail Pola Festival: यांत्रिकीकरणामुळे बैलपोळ्याचा उत्साह ओसरला; मावळात बैलांची संख्या घटली

शेतीतील बैलांचे महत्त्व कमी; शहरी भागात मातीच्या बैलांची पूजा, शेणखताच्या टंचाईमुळे शेतीच्या उत्पन्नावरही परिणाम
Bail
BailPudhari
Published on: 
Updated on: 

जगन्नाथ काळे

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरात बैलपोळा सण शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. कृषी संस्कृतीमध्ये बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते जपणारा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो, परंतु यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे या सणाचे महत्व दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

Bail
Ekveera Devi Navratri 2026: आई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण; दुर्गाष्टमी, महानवमीला २४ तास दर्शन

पूर्वी शेतीची मशागत, नांगरट, औत, कोळपणी, पिकांना मोटेच्या सहाय्याने पाणी देणे, शेतीचा माल बैलगाडीने वाहणे, अडतीवर विकण्यासाठी माल वाहणे आदी कामांसाठी बैलांचा उपयोग होत होता. बैलगाडी हे दळणवळणाचे साधन होते. लग्नाचेवेळी नवरी-नवरदेव बैलगाडीनेच आणले जायचे. आता ते दृश्य फारशे दिसत नाही. 'गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची' हे गाणे फारशे ऐकायला येत नाही. बैलांची नावे म्हवर्या, मस्तान्या, पाख-या, पतंग्या आदी असत. तसेच, गायींची नावे फुलवरी, बदामी, जमनी, कपिली आदी असत. प्रत्येकाच्या पदरी बैलजोडी असे. मोठ्या शेतकऱ्यांच्या पदरी अनेक बैलजोड्या आणि जनावरे असत. लग्नाचे वर्हाडही एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे बैलगाडीने नेले जायचे. अशावेळी पाच-पंचवीस बैलगाड्या एकामागोमाग जात असत.

Bail
Pimpri Illegal flex banners: स्मार्ट सिटीच्या खांबांना जाहिरात फलकांचा विळखा; सुशोभीकरणाचे तीन तेरा

शहरी भागात केली जातेय मातीच्या बैलांची पूजा

आता यांत्रिकीकरणामुळे बैलांची कामे फारच कमी झालेली आहेत. ज्यांच्याकडे टॕक्टर नाहीत ते शेतीच्या कामासाठी भाड्याने घेतात. यामुळे बैलांचे महत्व दिवसेंदिवस कमी झाल्यामुळे जनावरांची संख्या कमी झालेली आहे. पूर्वी जनावरांचे आठवडा बाजार भरत असत. यामध्ये मोठी अर्थिक उलाढाल होत असे. आता ती उलाढालही कमी झालेली आहे. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे बैलपोळ्याला जनावरे मोठ्या संख्येने दिसत नाहीत. ग्रामीण भागात थोडेफार दिसतात, परंतु शहरी भागात याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे बैलपोळ्याचा उत्साह कमी झालेला दिसत आहे. अनेकजण मातीच्या बैलांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात.

Bail
PCMC Project Cost: तब्बल वीस कोटींचा खर्च, तरीही माहिती मिळेना! खासगी एजन्सीवर उधळपट्टीचा सिलसिला कायम

बैलांची संख्या झाली कमी

बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची तुपाने, तेलाने खांदे भरणी करीत असत. आताही ज्यांच्या पदरी बैल आहेत, त्यांची खांदेभरणी केली जाते. तसेच, बैल पोळ्याच्या दिवशी दुपारी बैलांना धुवून आंघोळ घातली जायची. त्यांच्या शिंगांना हिंगुळ, वेगवेगळ्या रंगांचे बेगिड लावून त्यांच्या अंगावर झुल टाकून कपाळावर बासिंग लावले जात. तसेच, गळ्यात घुंगुरमाळा घालून सजविले जायचे. यानंतर जनावरांना घेवून मारुती मंदिरांना फेरी मारुन गावच्या वेशीवर नारळ फोडला जायचा. जनावरांची घरासमोर सहकुटूंब पूजा करुन 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' असा गजर केला जात असे. बैलांचे दर्शन घेवून त्यांना गोडधोड खाऊ घातले जात असे, हे दृश्य दिवसेंदिवस विरळ होत चालले आहे.

Bail
PCMC Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! ऑगस्ट २०२७ पर्यंत १० टक्के पाणीकपात

शेतीच्या उत्पन्नातही घट

काहीजण यांत्रिकीकरणामुळे जनावरांची बाजरात विक्री करत आहेत, परंतु मोठ्या मनाचा बळीराजा शेवटपर्यंत कुटुंबातील सदस्याप्रमाणे जनावरांना सांभाळतात. त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करतात. यांत्रिकीकरणामुळे जनावरांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेणखताची टंचाई भासत आहे. यामुळे शेतीच्या उत्पन्नातही घट होवू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news