Local Bodies Elections: निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे इच्छुकांचे डोळे; न्यायालय आदेशाला लोटला महिना

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपली.
Pimpri Local Bodies Elections
निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे इच्छुकांचे डोळे; न्यायालय आदेशाला लोटला महिना File Photo
Published on
Updated on

मलिंद कांबळे

पिंपरी: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्या आदेशाला महिना होत आला तरी, अद्याप त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढलेली नाही. त्यामुळे निवडणूक कधी होणार, याबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. आयोगाच्या आदेशाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपली. त्यापूर्वी 2017 मध्ये निवडणूक होऊन महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपची पाच वर्ष सत्ता असताना 2021 पासून शहरातील तत्कालीन नगरसेवक व इच्छुकांनी आपआपल्या प्रभागात जोरदार तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका झाल्या नाहीत. (Latest Pimpri News)

Pimpri Local Bodies Elections
Talegaon Dabhade Accident News: खासगी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, तळेगावातील घटना

महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट लागली. सव्वातीन वर्षे होत आले तरी, अद्याप महापालिकेत आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत 2022 च्या आधीची परिस्थिती होती, ती परिस्थिती कायम ठेवत चार महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महिन्याभरापूर्वी दिले. निवडणुकीबाबत चार आठवड्यातच नोटिफिकेशन काढा, असेही आदेशात म्हटले होते; मात्र एक महिन्यानंतरही अद्याप निवडणूक आयोगाने अधिसूचना न काढल्याने शहरातील इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. इच्छुकांनी तयारी सुरू केलेली असताना दुसरीकडे निवडणुकीबाबत स्पष्टता येत नसल्याने संभ्रम वाढला आहे.

प्रभागरचना नेमकी कोणती राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. विशेषतः सन 2017 च्या चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे की 2022 मधील केलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार, याकडे इच्छुक, माजी नगरसेवक व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

प्रभागातील लढतीबाबत पडद्याआडून हालचाली

राजकीय इच्छुक, पक्षांचे स्थानिक नेते यांच्याकडून सावध हालचाली केल्या जात आहे. प्रभाग रचनेबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असा दावा केला जात आहे. तोपर्यंत शहरातील प्रमुख आणि महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पडद्यामागे हालचाली सुरू ठेवल्या आहेत. पुढील काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच कोणता प्रभागात कोणता पक्ष कोणाच्या विरोधात लढेल, हे स्पष्ट होईल.

Pimpri Local Bodies Elections
Induri Civic Issue: तळेगाव - चाकण महामार्गावर इंदुरी येथे कचऱ्याचे ढीग, जबाबदार कोण?

निवडणूक घोषणेची प्रतीक्षा

प्रभाग रचनेबाबत अनिश्चितता कायम असली तरी इच्छुकांनी मतदारांशी संपर्कात राहण्यासाठी कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. काहीजण खर्चावर मर्यादा ठेवत मैदानात सक्रिय आहेत, तर काही माजी नगरसेवक अजूनही शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. इच्छुकांमध्ये वर्गणी, कार्यकर्ता सन्मान, प्रचार साहित्य यावर होणार्‍या खर्चाबाबत चिंता आहे. त्यामुळे निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजेपर्यंत बहुतांश इच्छुक थांबण्याच्या धोरणावर कायम आहेत.

महायुती होण्याची शक्यता कमीच

पिंपरी-चिंचवड शहरात महायुतीतील भाजपाचे प्राबल्य आहेत. महापालिकेत भाजपाचे 77 नगरसेवक होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक होते. अधिकाधिक इच्छुकांना संधी मिळावी म्हणून भाजपाकडून महायुती न लढण्याच्या मनस्थितीत आहे. भाजपा स्वबळावर लढणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडेही (अजित पवार गट) इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनाला (शिंदे गट) स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे. आरपीआयला भाजपच्या कोट्यातून काही जागा मिळू शकतील. महायुती होणार नसल्याने पर्यायाने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, आप हेदेखील आपल्या क्षमतेनुसार लढण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षात बैठकांचे सत्र सुरू आहे.

चार की तीन सदस्यीय प्रभाग?

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत सन 2017 मधील जुनी प्रभागरचना कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. शेजारच्या पुणे पालिकेसाठी नव्याने प्रभागरचना तयार करावी लागणार आहे. महापालिकेत नवीन गावे समाविष्ट झाल्याने तेथे नव्याने प्रभागरचना केली जाणार आहे. त्याबाबत अधिसूचना येत नाही तोपर्यंत स्पष्टता येणार नसल्याचे बोलले जात आहे.

आयोगाकडून सूचना मिळताच कार्यवाही

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोग तसेच राज्य शासनाकडून काही सूचना अद्याप प्राप्त झालेली नाही. आयोगाकडून सूचना मिळताच त्यानुसार महापालिकेकडून कार्यवाही सुरू केली जाईल, असे पालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news