

तळेगाव : पुण्याहून तळेगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला खासगी बसने धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल पिरोजीराव पवार (राहणार- काटे चाळ दापोडी) व पूजा भंडप्पा बिराजदार (रा- दापोडी) हे दोघे मोटारसायकलवरून पुण्याहून तळेगावच्या दिशेने येत होते. सोमाटणे टोलनाक्याजवळ पाठीमागून आलेल्या खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला पूजा बिराजदार या जागीच मृत्यूमुखी पडल्या.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बसच्या मालकाचा शोध घेऊन पोलिस उपनिरीक्षक कोकाटे गुन्हा दाखल करून घेत आहेत.