Anganwadi Staff Suspended: अंगणवाडीत 20 चिमुकल्यांना कोंडून मिटींगला गेल्या; निष्काळजी सेविका-मदतनीस अखेर निलंबित

बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब; बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केली कारवाई
Anganwadi Staff Suspended
Anganwadi Staff SuspendedPudhari News network
Published on
Updated on

पिंपरी : हिंजवडी, म्हातोबा टेकडीजवळील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून मिटींगला जाणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Anganwadi Staff Suspended
Anganwadi Child Lock: हिंजवडीत 20 बालकांना कोंडून सेविका-मदतनीस गायब! व्हिडिओ व्हायरल

ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवनाथ जांभुळकर यांनी पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांना फोन करून हिंजवडी ग्रामपंचायतअंतर्गत सहा अंगणवाडी केंद्राच्या सेविका व मदतनीस यांना ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीसाठी उपस्थित रहाण्याच्या सूचना देण्यास सांगितले होते.

Anganwadi Staff Suspended
Vehicle Crackdown: लोणावळ्यात धडाकेबाज पोलिस कारवाई! बिना नंबर प्लेटच्या 44 वाहनांवर थेट दंड

अंगणवाडी क्रमांक तीनमधील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या अंगणवाडीमध्ये मुलांना कोंडून मिटींगसाठी निघून गेल्या. त्यामुळे मुलांनी घाबरून रडारड केली. पालकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Anganwadi Staff Suspended
Municipal Election: तळेगाव निवडणुकीत नागरी प्रश्न ठरले गायब! प्रतिस्पर्धीही एका गटात

या प्रकरणाबाबत सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्रात बालकांना दरवाज्यास कुलूप लावून बैठकीस उपस्थित राहणे ही बाब बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याने सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Anganwadi Staff Suspended
River Rejuvenation Project: इंद्रायणी नदीला नवजीवन! महापालिकेकडून तब्बल 443 कोटींचा नदी सुधार प्रकल्प गतीमान

या प्रकरणातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव सोमवारी देण्यात येईल. सध्या क्रमांक 3 अंगणवाडीची जबाबदारी दुसऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे देण्यात आला आहे.

धनराज गिराम, (बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, मुळशी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news