Alandi Cheque Fraud Case: आळंदीत आध्यात्मिक संस्थेच्या धनादेशातून २ लाखांचा अपहार; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानच्या दोन धनादेशांचा गैरवापर केल्याचा आरोप; परभणी आणि पुण्यातील तिघांविरोधात आळंदी पोलिसांची कारवाई
Cheque Bounce Case
Cheque Bounce CasePudhari
Published on
Updated on

पिंपरी: आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन धनादेश वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली.

Cheque Bounce Case
PCMC Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख वाढला; जुलैमध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह, मलेरियाचाही शिरकाव

कीर्ती राजेश सोमाणी (५०), राजेश रामेश्वर सोमाणी (५५, दोघे रा. परभणी) आणि कमलकिशोर मंत्री (६५, रा. कोथरूड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिता भाऊसाहेब कड (६४, रा. बाणेर, पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Cheque Bounce Case
PCMC School Dropout Children Survey: एसआयआरच्या कामामुळे शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण रखडले; पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांसमोर दोन दिवसांत मोहीम पूर्ण करण्याचे आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानने सदगुरु रामेश्वर सोमाणी यांच्याकडे अध्यात्मिक प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी संस्थेकडून त्यांना नियमित मानधन दिले जात होते. अध्यात्मिक प्रचारासाठी संस्थेने एकत्रित दोन धनादेश दिले होते. दरम्यान, रामेश्वर सोमाणी यांचे निधन झाल्यानंतर संबंधित धनादेश आरोपींनी स्वतःकडे ठेवून त्यावरील दोन लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news