संतोष शिंदे
पिंपरी: तळेगावजवळील इंद्रायणी नदीपात्रात वसलेले कुंडमळा हे ठिकाण मागील काही वर्षांपासून पर्यटकांसाठी जीवघेणे ठिकाण सिद्ध होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय 2018 मध्ये कार्यान्वित झाल्यापासून या भागात तब्बल 22 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे.
त्यामुळे हे ठिकाण निसर्ग पर्यटनाचे आकर्षण न राहता मृत्युकुंड म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. रविवारी (दि. 15) झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर दै. ‘पुढारी’ने या गंभीर वास्तवावर प्रकाशझोत टाकला आहे. (Latest Pune News)
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत 2018 पासून आत्तापर्यंत जवळपास 22 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या प्रत्यक्षात याहून अधिक असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविली जाते.
अनेकवेळा अपघाताची नोंद न केल्याने अधिकृत आकडे अपुरे राहतात. काही प्रकरणांमध्ये मृतदेह चार-पाच दिवसांनी सापडतात, तर काहींचा आजतागायत पत्ता लागत नाही. स्थानिक रहिवासी नानभाऊ शेलार म्हणाले की, प्रशासन केवळ अपघात झाल्यानंतर
कुंडमळा येथे दरवर्षी काही पर्यटकांचा मृत्यू होतो. प्रत्येक विकेंडला पोलिस तैनात असतात; मात्र पर्यटक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पर्यटकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. पर्यटकांनी कुंडमळासारख्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड