Pune Bridge Collapse: पोटच्या पोराला वडिलांनी वाचविले! अंगावर शहारे आणणारा क्षण

काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग
Pune Bridge Collapse
पोटच्या पोराला वडिलांनी वाचविले! अंगावर शहारे आणणारा क्षणPudhari
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे- वेळ दुपारची. गणेश पवार नेहमीप्रमाणे साईटवरून घराकडे येत होता. चारचाकी शेलारवाडीत लावली. दुचाकीवरुन पुलापर्यंत आला. पुलावर पर्यटकांची इतकी गर्दी होती, की दुचाकी काढणेही अवघड होते. तो कसाबसा पुलाच्या मध्यभागावर पोचला. पुढे सरकता येईना म्हणून मिनिटभर एकाच जागी थांबावं लागलं.

आणि क्षणार्धात त्याच्या पुढता पुलाचा भाग धापकन् कोसळला. दुचाकीवर स्वार गणेश मागील बाजूस असल्याने तोही घसरला. मात्र प्रसंगावधान राखत त्याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग अनुभवताना परिसरात उमटणाऱ्या आर्त किंकाळ्यांकडे दुर्लक्ष करत त्याने मित्रांना फोन लावला. (Latest Pimpri News)

Pune Bridge Collapse
Pune Bridge Collapse: मालक पाण्यात पडल्यावर छोटू कासावीस! कुंडमळा अपघातात माणुसकीचं हृदयस्पर्शी दर्शन

मुलाची जेवणासाठी वाट बघत ओसरीला बसलेले गणेशचे वडील रामदास पवार यांना ही खबर मिळाली. त्यांनी पुलाकडे धाव घेतली. मुलाची दुचाकी तुटलेल्या पूलावर अडकलेली दिसली. त्यांनी उताराने जात मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. तो लोखंडी कठड्याला धरुन बसल्याचे त्यांना दिसले. त्याला धीर देत त्यांनी अलिकडच्या बाजूला आणले.

करकोळ जखमी झालेल्या गणेशने, मी ठीक आहे म्हणत वडिलांचा निरोप घेतला.... आणि पुलाच्या शाबूत भागावर श्री कुंडदेवी माता मंदिर असलेल्या भागाकडून तो त्याच्या जमलेल्या मित्रांसह पुन्हा नदीपात्रात इतरांच्या मदतीसाठी उतरला.

Pune Bridge Collapse
Pune Bridge Collapse: 'रिल्स'चा अतिरेक बेततोय जीवावर; सूचनांना केराची टोपली

तेथे यासर्वांनी एनडीआरएफ, वन्यजीव रक्षक मावळ आणि मदतीसाठी आलेल्या पथकांना अखेरपर्यंत साथ दिली. दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या या तरुणाने जीवाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त पर्यटकांचे प्राण वाचविण्यासाठी मित्रांच्या मदतीने दाखवलेल्या धाडसाचे कौतूक गावकरी करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news