Pimpri Accident: मिक्सरच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

या अपघातात मुलीची आई गंभीर जखमी झाली असून,तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Pimpri Accident
मिक्सरच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

पिंपरी: हिंजवडी परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असलेल्या वेळेत, वाहतूक नियमांच भंग करुन भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालविणार्‍या चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत 11 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मुलीची आई गंभीर जखमी झाली असून,तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथील इन्फोसिस सर्कलजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडला.

प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, जखमी आईचे नाव वैशाली संतोष बोराटे (वय 35) असे आहे. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (45, रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Latest Pimpri News)

Pimpri Accident
Har Ghar Tiranga: ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी तिरंगा अभियान

मंगळवारी संध्याकाळी वैशाली बोराटे आणि त्यांची मुलगी प्रत्युषा या दुचाकीवरुन (क्टिवा) हिंजवडी फेज 2 परिसरात काही कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान, त्या इन्फोसिस सर्कलजवळ रस्त्याच्याकडेला दुचाकीवर थांबलेल्या असताना फरहान मुन्नू शेख (25, रा. वाकड) हा चालक मिक्सर ट्रक घेऊन आला. या वेळी हिंजवडी परिसरात संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही आरोपीने नियमांकडे दुर्लक्ष केले.

भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या मिक्सर ट्रकने थेट दुचाकीला जोरात धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की प्रत्युषाचा जागीच मृत्यू झाला, तर वैशाली बोराटे गंभीर जखमी झाल्या.

Pimpri Accident
Stray dogs news: पिंपळे गुरव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

वाहतूक नियमांचे उल्लंघन

हिंजवडी व आसपासच्या परिसरात सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. या बंदीचा उद्देश वाहतूककोंडी टाळणे आणि अपघाताचा धोका कमी करणे हा आहे. मात्र, आरोपीने नियम मोडल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

माझी मुलगी प्रत्युषा ही आमच्या आयुष्याचा गोड श्वस होती. अभ्यासात हुशार, स्वभावाने प्रेमळ तिच्या चेहर्‍यावरचे हास्य आमच्या घरातला प्रकाश होता; पण एका बेजबाबदार चालकाच्या निष्काळजीपणामुळे माझी चिमुकली कायमची निघून गेली. मी पोलिस आणि प्रशासनाला विनंती करतो की, अशा चालकांना कठोर शिक्षा द्या, जेणेकरून दुसर्‍या कोणाच्या घरी असा काळा दिवस उगवू नये. माझ्या मुलीला न्याय मिळावा, हीच माझी अखेरची अपेक्षा आहे.

- संतोष बोराटे, प्रत्युषाचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news