Har Ghar Tiranga: ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी तिरंगा अभियान

'वंदे मातरम’, ’भारत माता की जय’, ’जय हिंद’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
Har Ghar Tiranga
ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी तिरंगा अभियानFile Photo
Published on
Updated on

पिंपरी: हातामध्ये तिरंगा, देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून सोडलेला परिसर अन् ढोल-ताशांचा गजर. अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ’घरो घरी तिरंगा’ अभियानाचा सोहळा केवळ प्रभात फेरीतूनच नव्हे, तर नागरिकांच्या हृदयातून अवतरला. यानिमित्ताने देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे उगवत्या सूर्याला साक्षी ठेवत ऐक्याची प्रभात उजळवली.

’घरो घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साह, देशभक्ती आणि ऐक्याचा संदेश देणार्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. (Latest Pimpri News)

Har Ghar Tiranga
Pimpri Crime: जमिनीच्या वादातून एकास मारहाण

प्रत्येक शाळेने आपल्या परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. ’वंदे मातरम’, ’भारत माता की जय’, ’जय हिंद’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.

विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा, देशभक्तीचे फलक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी पोस्टर्स घेऊन प्रभात फेरीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ’प्लास्टिकमुक्त भारत’, ’स्वच्छ भारत अभियान’, ’जलसंवर्धन’, ’वृक्षारोपण’ यांसारख्या विषयांवर आधारित संदेशफलक फेरीत दाखवले. यामुळे प्रभात फेरी केवळ राष्ट्रीय सणाचा भाग न राहता समाजहिताच्या मूल्यांचा प्रचार करणारा उपक्रम ठरला.

Har Ghar Tiranga
Stray dogs news: पिंपळे गुरव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news