पिंपळनेर : दहिवेल येथील सतलोज ढाब्यावर छापा टाकून केमीकल जप्त

पिंपळनेर : कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेला अवैध केमिकल वाहतूक करणारा टँकर.
पिंपळनेर : कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेला अवैध केमिकल वाहतूक करणारा टँकर.
Published on
Updated on

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दहिवेल येथे सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सतलोज ढाबा येथे छापा टाकून वाहनासह केमिकल व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

डॉ. बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदशनाखाली नेमणूक केलेल्या पथकाने तसेच विनायक नरेंद्र कोळी, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय साक्री तसेच साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी व आमदार यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. या कारवाईमध्ये सतलोज ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत तसेच हॉटेल न्यू कल्याणी बाहेरील मोकळ्या जागेत व हॉटेल संयोगचे आवारातील मोकळ्या पटांगणाचे नेटचे कंपाउंड येथील काही खोल्यांमध्ये केमिकल जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत संभाजीत रामतीरम यादव (४२, रा. गोपालपूर जिल्हा फैजाबाद राज्य उत्तर प्रदेश सध्या सतलोज ढाबा बोडकीखडी शिवार ता. साक्री), रमेश सोनकर (४५, रा. समराह बनारस राज्य उत्तर प्रदेश), इमरान शेख मूवी युदिन शेख (३५, रा. साहेबरज राज्य झारखंड) हे टँकर (एम. एच. ४३. बी. ८४६६) चालक आरोपी नामे सियाराम मोरया मूळ (रा. उत्तर प्रदेश सध्या रा.सतलोज ढाबा बोरकिखडी शिवार), सुरज पासी (रा. उत्तरप्रदेश सध्या रा. सतोज ढाबा बोरकिखडी), भोपा उर्फ गोपा भाई मूळ (रा. गुजरात अरुण मूळ रा. उत्तरप्रदेश), श्रावण (रा. कानपूर), जुम्मनभाई (रा. मुंबई) विजय (रा. सुरत), सलीम (रा. मुंबई), महेश पांडे (रा. कानपूर) अरुण पांडे तसेच हॉटेल न्यू कल्याणी व हॉटेल संयोग येथे ताब्यात घेण्यात आलेले अक्रम सत्तार (रा. उत्तर प्रदेश), लालजी सर्वप्रसाद उपाध्याय (६५, रा. अमराना बधाई राज्य, उत्तर प्रदेश) यांनी एकमेकांशी संगनमत केली. त्यानंतर आर्यन केमिकल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड गुजरात या कंपनीमधून गुजरात राज्यातून मेटल मेहता केमिकलने भरलेला टँकरचालक (एम. एच ४३ बी. एक्स ८४६६) हा डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना रासायनिक द्रव्य केमिकलने भरलेला टँकरची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या हेतूने व टँकरमधील अवैध केमिकल बनण्याचे साहित्य व साधने वापरताना आढळले. रासायनिक द्रव्य केमिकलबाबत आवश्यक ती खबरदारी न घेता टँकरमधून साठवणूक करुन काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना तसेच सुरत ते धुळे मार्गावरुन हस्तगत करण्यात आले. यामध्ये सुमारे ८४,२८, ३१८ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news