

रिओ द जानेरो : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली असून त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या मुलीने दिली. पेले ख्रिसमसमध्ये रुग्णालयातच राहणार आहेत. पेलेंच्या प्रकृतीबाबत अलबर्ट आईन्स्टाईन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 82 वर्षांचे फुटबॉलपटू पेले यांची किडनी आणि हृदय सुरळीत काम करत नाही. त्यामुळे त्यांना एलिव्हेटेड केअरमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी पेलेंच्या श्वसन मार्गातील इन्फेक्शनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांचा श्वसनाचा आजार बळावला होता. (Pele Health)
पेलेंच्या मुलीने सांगितले की, 'आम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून असे ठरवले आहे की त्यांना काही दिवस रुग्णालयातच ठेवणे योग्य राहील. आमचे नवे कुटुंब आईन्स्टाईन रुग्णालय त्यांची चांगली काळजी घेत आहे.' (Pele Health)
हेही वाचा…