पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक विजयानंतर अर्जेंटिना लिओनेल मेस्सीची प्रतिमा अर्जेंटिनाच्या चलनी नोटेवर (Messi Currency) छापणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेने यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते आहे. तब्बल 36 वर्षांनी अर्जेंटिनाला जगज्जेता बनवणा-या मेस्सीचा गौरव व्हावा अशी इच्छा बँकेच्या संचालकांनी नुकत्यात झालेल्या बैठकीत व्यक्त केली. यावेळी एक प्रस्ताव सादर करून त्यात 1000 पेसोच्या (अर्जेंटिनाचे चलन) नोटेवर मेस्सीचा फोटो छापला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणा-या अर्जेंटिनाच्या मेस्सी आणि संघातील इतर खेळाडूंच्या लोकप्रियतेत अनेक पटींनी वाढ झाली आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसह मायदेशात पोहताच जगज्जेत्या संघाचे जंगी स्वागत झाले. देशाची राजधानी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यांवर लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती लावली. (Messi Currency) अशातच आता मेस्सीचा फोटो चक्क देशाच्या चलनी नोटेवर छापला जाणार असल्याचे वृत्त व्हायरल होताच चाहत्यांच आनंद गगणात मावेना अशी स्थिती झाली आहे. दरम्यान, याबाबत अर्जेटिना सरकार आणि मेस्सीकडून अधिकृतपणे कसलेच निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, हे वृत्त येणा-या काळात खरे ठरले तर एखाद्या देशाने आपल्या चलानावर खेळाडूला स्थान दिल्याची पहिलीच वेळ ठरेल.
हेही वाचा;