

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेल्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला 183 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जो अर्शदीप सिंग आणि गोलंदाजांनी योग्य ठरविला. परंतु नितेशने केलेल्या 64 धावांच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत नऊ गडी गमावून 182 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पंजाबविरुद्ध हैदराबादची सुरुवात खराब झाली. सुरूवातीलाच 39 धावांवर हैदराबादने तीन गडी गमावले. अर्शदीप सिंगने हैदराबादच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच रोखून धरले आणि उर्वरित कामगिरी करण आणि हर्षलने केली. मात्र, नितीश रेड्डी चांगली खेळी करत संघाचा डाव सावरत कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. समदनेही हैदराबादसाठी वेगवान खेळी खेळली आणि तो 12 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोन फलंदाजांशिवाय संघाचा अन्य कोणताही फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकले नाहीत. (PBKS vs SRH)
दोन्ही संघ :
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, सॅम कुरन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर : प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय थियागराजन, राहुल चहर, ऋषी धवन.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.
हेही वाचा :