Ramdas Athawale :  ...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले    | पुढारी

Ramdas Athawale :  ...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले   

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, यानिमित्ताने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून होत आहे. दलित समाजबांधवांनी चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये. संविधान वाचवण्यासाठी मी तिथे दिल्लीत आहे आणि जर अशी वेळ आली. तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल. पण मुळात अशी वेळ येणारच नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (दि.९) केला. Ramdas Athawale

आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विदर्भातील गोंदिया येथे माध्यमांशी आठवले बोलत होते. महाविकास आघाडी जागावाटप जाहीर झाले असले तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये काँग्रेसवर अन्यायच झाला  आहे. सांगलीसारखी महत्त्वाची जागा त्यांना देण्यात आली नाही. यात शिवसेना वरचढ झाली असून आता काँग्रेसने विचार करणे आवश्यक  आहे.  Ramdas Athawale

काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.  आम्ही आणत नाही प्रचारांमध्ये गुंडे, काँग्रेसकडे आहेत पैशाची हांडे, असे नाना पटोले यांनी केलेल्या आरोपावरून म्हणत लोकशाहीमध्ये कोणी प्रचारांमध्ये गुंड आणत नाही आणि गुंडांना मत मिळत नाही. उलट कमी होतात, त्यामुळे गुंडशाहीचा आम्ही उपयोग करत नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button