कोण होणार करोडपती
कोण होणार करोडपती

कोण होणार करोडपती : परेश रावल यांची पहिल्यांदा मराठी कार्यक्रमात हजेरी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात 'कोण होणार करोडपती'मध्ये शनिवारच्या 'विशेष भागात' परेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेत.

ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगावकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती.

परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल.

त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले १०० वे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news