पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान. ( संग्रहित छायाचित्र )
पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान. ( संग्रहित छायाचित्र )

मोठी बातमी : इम्रान खान पाकिस्‍तानच्‍या निवडणुकीतून ‘आऊट’, आयोगाने नामांकन नाकारले

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विविध आर्थिक घोटाळ्यात अडकलेले पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना देशाच्‍या निवडणूक आयोगाने आज (दि.३०) मोठा दणका दिला. आयोगाने त्‍याचे २०२४ च्या निवडणुकीसाठी नामांकन नाकारले असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. ( Pakistan election body rejects ex-PM Imran Khan's nomination )

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी २०२४ मध्‍ये होणार्‍या राष्ट्रीय निवडणुका दोन मतदारसंघात नामांकन भरले होते. मात्र आता पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्‍यांचे दोन्‍ही मतदारसंघातील नामांकन नाकारले आहे. ७१ वर्षीय इम्रान खान यांची एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाली होती. आर्थिक घोटाळा प्रकरणी त्‍यांना ऑगस्ट २०२२ मध्‍ये तीन वर्षांची कारावासाचीही शिक्षा सुनावण्‍यात आली होती. यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे 8 फेब्रुवारी रोजी होणार्‍या राष्ट्रीय निवडणुका लढवण्यास त्‍यांना अपात्र ठरवण्यात आले होते; परंतु यानंतरही त्‍यांनी २९ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ( Pakistan election body rejects ex-PM Imran Khan's nomination )

निवडणूक आयोगाने दिले कारण…

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "इम्रान खान यांचे नामांकन नाकारण्यात आले आहे. कारण ते मतदारसंघाचे नोंदणीकृत मतदार नव्हते. तसेच त्‍यांना आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे." इम्रान खानच्‍या पक्षाच्‍या सूत्रांनीही याला दुजोरा देत देशातील सर्वात लोकप्रिय नेत्‍याला निवडणुकीपासून दूर ठेवले जात असल्‍याचा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने २२ डिसेंबर रोजी खान यांना जामीन मंजूर केला आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाने म्‍हटलं आहे की, "इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लढण्यास अपात्र ठरवण्यात आले होते; परंतु त्यांनी शुक्रवारी (डिसेंबर 29) उमेदवारी अर्ज दाखल केला. इम्रान खान यांनी त्यांच्या जन्मगावी मियानवली येथून निवडणूक लढवण्यासाठी दुसरा उमेदवारी अर्जही दाखल केला होता, तो फेटाळण्यात आला आहे."

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news