

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमरग्याचे तहसीलदार राहुल पाटील यांना रंगेहाथ अटक केली. उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी (दि.२४) दुपारी तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानी ही कारवाई केली.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांना शेतामध्ये घराच्या बांधकामासाठी ४ ट्रक वाळूची आवश्यकता होती, बुधवारी तक्रारदार पंचांसह तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मध्यस्थीमार्फत ४ ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तहसीलदार यांनी २० हजारांच्या लाचेची मागणी करून ती पंचांसमक्ष स्वीकारली.
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक तथा सापळा अधिकारी प्रशांत संपते, पथकातील पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, विशाल डोके, जाकेर काझी यांनी ही कारवाई केली.
हेही वाचलंत का ?