दै. ‘पुढारी’ व पीसीईटी यांच्यातर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन | पुढारी

दै. ‘पुढारी’ व पीसीईटी यांच्यातर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे शनिवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम दहावी, बारावींच्या विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित करण्यात आला आहे.

सेमिनारमध्ये महाराष्ट्र असो. ऑफ टीपीओचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे हे ‘अभियांत्रिकी कॉलेजची निवड व प्लेसमेंटच्या संधी’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर करिअर सल्लागार प्रा. विजय नवले हे ‘बारावीनंतरचे करिअर निवड’ याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवड करावी, कोणकोणते कॉलेज आहेत, प्रवेश प्रक्रिया, अर्ज कसा करावा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, मार्केटमधील ट्रेंड याबाबत माहिती देत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात येणार आहे.

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरचे टेन्शन असते. एक काळ असा होता की दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल या विचाराने विद्यार्थी तणावात असायचे. पण, आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू शकतात. यासह अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9404077990 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Back to top button