

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. केदार यांच्यासह इतर तीन जणांनादेखील शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असताना या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील तेलगाव येथे 2016 साली ट्रान्समिशन लाईन टाकण्यावरून शेतकऱ्यांचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. विकोपाला गेलेला हा वाद आमदार सुनील केदार यांच्यापर्यंत पोहचला. यावेळी आमदार केदार यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने याप्रकरणी सावनेर तालुक्यातील केळवद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयाने यासंदर्भात शिक्षा सुनावली.
-हेही वाचा