पुण्यात ‘या’ बीआरटी मार्गावर ऑईलचा टँकर पलटी; वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा…

पुण्यात ‘या’ बीआरटी मार्गावर ऑईलचा टँकर पलटी; वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा…
Published on
Updated on

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर चंदननगर भागात सकाळी दहाच्या सुमारास एक ऑईलचा टँकर बीआरटी मार्गावर पलटी झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले आहे. पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला असून टँकरमधील निम्मे ऑईल रस्त्यावर वाहून आले आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ऑईल सांडलेल्या जागेवर माती टाकण्याचे काम सुरू आहे.

या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नसून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ऑईल दूरपर्यंत वाहून गेल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून प्रशासनांकडून वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, बीआरटी मार्गावर जड वाहनांना बंदी असतानाही हा टँकर आत गेला कसा असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news