

पुढारी ऑनलाईन डेस्क : खराब कामगिरीमुळे ट्रोलर्सनी भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज भुवनेश्वर कुमारला धारेवर धरले आहे. यावेळी त्याची पत्नी नुपूर नागर त्याच्या मदतीला धावून आली आहे. तिने इंस्टाग्रामला एक स्टोरी पोस्ट करत ट्रॉलर्सना चांगलेच सुनावले आहे.
आशिया कप त्यासोबत ऑस्ट्रेलिया दौरा यामध्ये भुवनेश्वरची खराब कामगिरी दिसून आली. २० सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या मॅचमध्ये १९ व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरने १६ रन्स दिल्या. या मॅचमध्ये त्याने एकट्याने त्याच्या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ३१ रन्स दिल्याने कांगारूंना २०९ रणांचे टार्गेट सहज करता आले असे क्रिकेट फॅन्स म्हणतायेत. भुवनेश्वरला शेवटच्या ओव्हर्सचा स्पेशालिस्ट म्हटलं जातं. पण शेवटच्या तिन्ही मॅचेसमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला दिसून आला नाही. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने १९ व्या ओव्हरला तब्बल ४९ रन्स दिल्या आहेत.
त्याच्या या खराब कामगिरीमुळे ट्रोलर्सनी त्याला टीम मधून काढावे, त्याचबरोबर T२० वर्ल्डकापला ही घेऊ नये अशी मते मांडली आहेत. याला उत्तर देताना त्याची पत्नी नुपूर म्हणतेय, 'आजकाल लोक इतके बेकार झाले आहेत की, त्यांच्याजवळ चांगले करण्यासाठी काहीच नाहीय. पण द्वेष आणि ईर्ष्या पसरवायला वेळ आहे. त्यामुळे मी यांना एक सल्ला देऊ इच्छिते की, तुमच्या अशा वाईट शब्दांचा कोणावर इतका परिणाम होणार नाहीय, त्यामुळे तुमचा वेळ चांगल्या गोष्टींसाठी वापरा. मला जाणीव आहे तुम्हा लोकांना अशा चांगल्या गोष्टी करता येणार नाहीत पण प्रयत्न करा.'
हे वाचलंत का?