आयएनएस विशाखापट्टणमचे जलावतरण, भारताच्या सागरी शौर्याचे प्रतीक बनणार

आयएनएस विशाखापट्टणमचे जलावतरण, भारताच्या सागरी शौर्याचे प्रतीक बनणार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा" image="http://"][/author]

मुंबईच्या नौदल गोदीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. अत्याधुनिक शस्त्रे आणि आधुनिक टेहळणी रडारसह सेन्सर्स असलेली स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रनाशक विनाशिका म्हणून आयएनएस विशाखापट्टणमची ओळख आहे. ही विनाशिका भारताच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक बनेल, असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात विशाखापट्टणम या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधणी केलेल्या पहिल्या विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, आयएनएस विशाखापट्टणम सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे संरक्षण करेल. 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीमुळे भारत लवकरच जागतिक जहाज बांधणी केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नौकानयन स्वातंत्र्य आणि सागरी मार्गांची सुरक्षा आवश्यक आहे. ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे. सशस्त्र दल आणि संपूर्ण देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करू शकणारी जगातील सर्वात तांत्रिकद़ृष्ट्या अत्याधुनिक गायडेड क्षेपणास्त्र युद्धनौकांपैकी ही एक युद्धनौका आहे, अशा शब्दांत त्यांनी या विनाशिकेचे वर्णन केले

.
जागतिक सुरक्षेसंदर्भात उद्भवलेली कारणे, सीमावाद आणि सागरी वर्चस्व यांनी देशांना त्यांचे संरक्षण सामर्थ्य बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राने सरकारच्या धोरणांचा लाभ घेऊन, एकत्रितपणे काम करून देशाला स्वदेशी जहाज बांधणीचे केंद्र बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारने केलेल्या अनेक सुधारणांची यादी सादर करत सिंह यांनी या सुधारणांद्वारे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतात, असे म्हणाले.

नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग, खासदार अरविंद सावंत, ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅडमिरल नारायण प्रसाद (निवृत्त) आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस विशाखापट्टणम विनाशिका नौदलात समावेश करण्याच्या समारंभाला उपस्थित होते.

युद्धनौकेची वैशिष्ट्ये

  • आयएनएस विशाखापट्टणमचे वजन 7 हजार 400 टन असून ही विनाशिका 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे. भारतात बांधणी करण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि विशेष क्षमता असलेल्या युद्धनौकांपैकी ही एक म्हणता येईल.
  • कंबाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीचे मिश्रण असलेल्या चार अतिशय ताकदवान टर्बाईन्सवर अतिशय वेगाने पाणी कापत पुढे जाणारी ही युद्धनौका असून ती 30 नॉटपेक्षा (ताशी 30 सागरी मैल किंवा 54 किमी) जास्त वेग प्राप्त करू शकते.
  • स्टेल्थ म्हणजे रडारला चकवा देणारी ही युद्धनौका असून तिच्या संपूर्ण सांगाड्याचा आकार आणि त्यावरील आवरण रडारला चकवा देण्याच्या वैशिष्ट्यांसह कमीत कमी काटछेदासह बनवण्यात आले आहे. फुल बीम सुपरस्ट्रक्चर डिझाईन, प्लेटेड मास्ट आणि खुल्या डेकवर रडार लहरींना परतू न देणार्‍या सामग्रीचा वापर अशा वैशिष्ट्यांमुळे रडारला चकवा देण्याची क्षमता या विनाशिकेत आहे.
  • अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी ही विनाशिका सुसज्ज आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघू पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेटस्, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे.
  • मारा करणार्‍या तोफा आणि इतर प्रणालीला लक्ष्याची तपशीलवार माहिती देणारे अत्याधुनिक टेहळणी रडार यावर बसवण्यात आले आहे. या विनाशिकेची पाणबुडीविरोधी क्षमता बळकट करण्यासाठी स्वदेशी बनावटीची रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्स आणि एएसडब्लू हेलिकॉप्टर्स आहेत.
    आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना तोंड देण्याची या विनाशिकेमध्ये क्षमता आहे. या विनाशिकेच्या बांधणीत स्वदेशी बनावटीच्या सुमारे 75 टक्के सामग्रीचा समावेश असल्याने आत्मनिर्भर भारतमध्ये तिचे मोलाचे योगदान आहे.
  • युद्ध व्यवस्थापन प्रणाली, रॉकेट लॉन्चर, टॉर्पेडो ट्युब लॉन्चर, इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, स्वयंचलित ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, फोल्डेबल हँगर डोअर, हेलो ट्रॅव्हर्सिंग प्रणाली, क्लोज इन वेपन सिस्टम आणि बो माऊंटेड सोनार यासारख्या स्वदेशी बनावटीच्या प्रणालींचा यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news