

पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ अतिवेगाने वाहन चालवणे म्हणजे निष्काळजीपणे वाहन चालवणे असे नाही. विशेषत: थांबलेल्या किंवा चालत्या वाहनाला बेजबाबदारपणे ओव्हरटेक करणे हेही निष्काळजीपणे वाहन ( Negligent driving ) चालविण्यासारखेच आहे, निरीक्षण नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. दिल्लीत २२ जुलै २०१२ रोजी इंडिकेटर न लावत रस्ताच्या मध्यभागी उभा असलेल्या डीटीसी बसला धडक लागून मोटारसायकलस्वारचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवले आहे.
अपघातानंतर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला १७ लाख रुपये नकुसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते. मात्र मृत व्यक्तीची निष्काळजीपणे अपघात झाल्याने या नुकसान भरपाईतील २० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेपासून विमा कंपनीने पैसे भरेपर्यंत याचिकाकर्त्यांना ७.५ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाईतील २० टक्के रक्कम कपात करण्याचे आदेशाविरोधात कुटुंबाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती गोरांग कांत यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, "या प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे डीटीसी बस रस्त्याच्या मध्ये उभा होती. बेजबाबदारपणे पार्किंग केल्यामुळे हा अपघात झाला आहे यात शंका नाही; पंरतु ओव्हरटेक करताना काळजी घेतली असती तर हा अपघात टाळता आला असता. केवळ अतिवेगाने वाहन चालवणे म्हणजे निष्काळजीपणे वाहन चालवणे असे नाही. विशेषत: थांबलेल्या किंवा चालत्या वाहनाला बेदरकारपणे ओव्हरटेक हेही निष्काळजीपणे वाहन चालविण्यासारखेच आहे."
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती ५४ वर्षांचा होता. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी होती, असे स्पष्ट करत न्यायालयाने संबंधिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून ४२ लाख रुपये द्यावेत, असेही स्पष्ट केले.
हेही वाचा :