North-East election : नरेंद्र मोदी आणि भाजपशिवाय भारताला पर्याय नाही – चंद्रकांत पाटील

North-East election : नरेंद्र मोदी आणि भाजपशिवाय भारताला पर्याय नाही – चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशान्येकडील नागालँड आणि त्रिपुरा या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवीत आपल्या विजयाचा डंका वाजवला. मेघालयात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे २७ जागांसह कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील 'एनपीपी' हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दरम्यान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी ईशान्यकडील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या निवडणुकांचा संदर्भ देत म्हंटल आहे की," पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींशिवाय आणि भारतीय जनता पार्टीशिवाय आता संपूर्ण भारतालाही पर्याय नाही" वाचा सविस्तर बातमी. (North-East election)

ईशान्येकडील राज्ये मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा यांच्या विधानसभा निवडणुकांचा काल निकाल लागला. यात भाजप आघाडीवर होता. नागालँड आणि त्रिपुरा या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. तर  मेघालयात २७ जागांसह कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील 'एनपीपी' हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी ६० जागा आहेत. विशेषतः, नागालँड या ख्रिस्तीबहुल राज्यात भाजपने मिळवलेला धडाकेबाज विजय लक्षणीय मानला जात आहे. या राज्यात मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीपीपी'ने २३ जागा जिंकल्या तर भाजपने १२ जागांवर बाजी मारली आहे. दरम्यान, मेघालयमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने कोनराड संगमा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे

North-East election : 'मोदी,मोदी' घोषणांनी ईशान्य भारत दणाणून उठला

चंद्रकांत पाटील यांनी,"मोदी, मोदी' अशा घोषणांनी संपूर्ण ईशान्य भारत दणाणून उठला आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींशिवाय आणि भारतीय जनता पार्टीशिवाय आता संपूर्ण भारतालाही पर्याय नाही. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील जनतेचा मोदीजींप्रति असलेला उत्साह तुम्ही पाहू शकता."असं ट्विट करत त्यांनी एक मिनिट एक सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर electionresult2023 असा हॅशटॅग दिला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा निकालानंतर विजयोत्सवाचे क्षण आहेत. त्यानंतर प्रचारादरम्यानचे केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा यांचे काही क्षण दाखवले आहेत. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारादरम्यानच्या भाषणामधील काही भाग दाखवला आहे. यामध्ये पंतप्रधान म्हणतं आहेत.,"जिथे भाजपचे सरकार एकदा आले की जनता तेथे पुन्हा भाजपला निवडून देते. असे घडते कारण भाजप धर्म, जात, पात, पंथ यावर आधारित भेदभाव करत नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news