

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या ( bigg boss marathi 3) घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. यावेळेचे नॉमिनेशन कार्य इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळी बिग बॉस घरातून कोणता सदस्य नॉमिनेट होणार? आणि कोण होणार सेफ? हे पाहणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.
बिग बॉस घरात ( bigg boss marathi 3) मागील आठवड्यात बर्याच गोष्टी घडून गेल्या आहेत, जे अजूनही बरेच सदस्य विसरले नाहीत. कुठेतरी त्याचे पडसाद आजच्या कार्यावर पडणार हे नक्की आहे. कोणता सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार? आणि कोण सेफ होणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी सांगितले आहे की, "आज बिग बॉसच्या घराला साजेस असं तोरण लागणार आहे. ज्या सदस्यांचे फोटो तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील. आणि ज्याचा फोटो तोरणावर असणार आहे ते पुढील खेलासाठी सेफ राहणार आहेत.
बघुया आज कोण कोणाला करणार नॉमिनेट आणि कोण होणार सेफ. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
हेही वाचलंत का?