दिव्यात आगीमुळे घर कोसळले; महिलेचा मृत्यू - पुढारी

दिव्यात आगीमुळे घर कोसळले; महिलेचा मृत्यू

ठाणे; पुढारी वृत्तसेवा

दिवा येथील देसाई गावातील वेताळ पाड्यात आगीमुळे घर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी दोघे अडकल्याची भीती वर्तवली जात होती. त्यामध्ये घर मालकीण सपना विनोद पाटील (४०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सोमवारी सकाळी दिव्यात पडीक घराला आग लागून घर कोसळले. यावेळी दोघे तेथे अडकल्याची भिती वर्तविण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले.

तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. हे घर विनोद पाटील यांच्या मालकीचे असून घराच्या संरचनेत अडकलेल्या सपना (४०) यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी एक फायर इंजिन, एक वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचलत का?

Back to top button