

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 21 ते 24 जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जात आहे. अमेरिकेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. PM मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत जगात अव्वल स्थानावर आहेत, असा सर्व्हे मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अमेरिकेत देखील PM मोदींचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील अनिवासी भारतीयांमध्ये मोदी यांची विशेष क्रेझ आहे.
PM मोदी हे अमेरिका दौऱ्यावर येत आहेत हे समजल्यानंतर तेथील मोदी यांच्या अनेक चाहत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या संदेशातून आपला आनंद व्यक्त केला आहे.
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. मात्र, एका चाहत्याने लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या कारवर नरेंद्र मोदी यांच्या नावाची नेमप्लेट लावली आहे. याचे नाव राघवेंद्र असे आहे. तो अमेरिकेतील मेरीलँड येथे वास्तव्यास आहेत. त्याने आपल्या कारवर नरेंद्र मोदी यांच्या नावातील पहिले अक्षर 'N' आणि मोदी नावाचे स्पेलिंग MODI असे मिळून 'NMODI' अशी नेमप्लेट तयार करून ती आपल्या कारवर लावली आहे.
'NMODI' ही नेमप्लेट कारवर लावल्यानंतर त्याने याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. एएनआयने याची माहिती ट्विटकरून पोस्ट केली आहे.
माहितीनुसार, राघवेंद्र हे अमेरिकेतील मेरीलँडमध्ये येथे वास्तव्याला आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी आपल्या कारची नेम प्लेट 'NMODI' लावली आहे. राघवेंद्र एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हणाले की,"मी नोव्हेंबर २०१६ मध्ये ही प्लेट घेतली. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मला देशासाठी, समाजासाठी, जगासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिली. पंतप्रधान मोदी येथे येत आहेत त्यामुळे मी त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
हेही वाचा