

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक समस्यांवर उडत्या बस हा उपाय ठरेल असे सांगितले. भविष्यात पुण्यात उडणाऱ्या बस आणू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. उडत्या बसचे नेमके तंत्रज्ञान काय आहे, त्यांचे संशोधन कोणत्या कंपन्या करत आहेत, याबद्दलची नागरिकांत उत्सुकता आहे. पुण्यातील चांदनी चौक येथील उड्डाणपुलाच्या उद्गघाटन समारंभात ते बोलत होते. गडकरी यांनी यापूर्वीही या संदर्भातील आश्वासन दिले होते.
तंत्रज्ञान काय आहे?
विमानाच्या आताच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याचा प्रयत्न बऱ्याच कंपन्या करत आहेत. आताच्या विमानांना उड्डाणासाठी आणि लँडिंगसाठी धावपट्टी लागते. पण बऱ्याच कंपन्या व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग करू शकणारे वाहन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच हे वाहन उभ्या असलेल्या जागेवरूनच हवेत झेपावेल आणि त्याच प्रकारे लँड होऊ शकेल. तसेच हे वाहन इलेक्ट्रिक असेल. याला Electric Vertical Take-off and Landing (eVTOL) असे म्हटले जाते.
विमान निर्मितीली अग्रगण्य कंपनी असलेल्या बोईंगच्या वतीने Boeing Next हा प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत पॅसेंजर एअर व्हेईलकलची निर्मिती करण्यात आलेली आहे. ऑन डिमांड मोबिलिटी असे याचे स्वरूप आहे. जानेवारी महिन्यात याची यशस्वी चाचणीही घेण्यात आलेली आहे. यावर अजून काही चाचण्या घेतल्या जात असल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर म्हटले आहे.
Airbus वाहन | Nitin Gadkari Flying Bus
या दोन कंपन्याच्या व्यतिरिक्त जगभरात २७९ कंपन्या अशा प्रकारच्या एअर क्राफ्टवर संशोधन करत आहेत, असे Tracxn या वेबसाईटने म्हटले आहे. जर्मनीतील एक कंपनी लिलियने त्यांच्या 'फ्लाईंग टॅक्सी'ची चाचणी गेल्याच महिन्यात घेतलेली आहे. Wisk Aero या कंपनीनेही अशा प्रकारच्या विमानांची चाचणी घेतलेली आहे.