नेहमी दुःस्वप्न येतात-हलक्यात घेऊ नका, होऊ शकतो मेंदूचा ‘हा’ गंभीर आजार (nightmares linked to dementia)

नेहमी दुःस्वप्न येतात-हलक्यात घेऊ नका, होऊ शकतो मेंदूचा ‘हा’ गंभीर आजार (nightmares linked to dementia)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – तुम्ही निवांत झोपेत असता आणि स्वप्नात तुमचा अपघात होतो. किंवा स्वप्नात जवळच्या कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो. अशा स्वप्नांमुळे तुम्ही झोपेतून खडबडून जागे होता. जे घडलं ते खरं नाही तर स्वप्न होते, हे समजून तुम्हाला हायसे वाटते. पण तुम्हाला नेहमीच अशी दु:स्वप्न किंवा भीतीदायक स्वप्न पडत असतील तर ती एका मोठ्या आजाराची लक्षण असू शकतात, असे संशोधकांनी म्हटलेले आहे. (nightmares linked to dementia)

मध्यमवयात जर अशा प्रकारची स्वप्न वारंवार पडत असतील तुमची Congnitive (संज्ञात्मक) क्षमता कमी होत असल्याचे एक लक्षण असून अशा व्यक्तींत वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश (Dementia) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
EClinicalMedicine या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हे नियतकालिक Lancet Discovery Science चा भाग आहे. सतत जर तणाव निर्माण करणारी स्वप्न पडत असतील तर याचा थेट संबंध विचार करण्याची क्षमता कमी होण्याशी आहे, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.

ब्रिमिंगहॅम विद्यापीठाने केलेल्या या संशोधनात ३५ ते ६४ वयोगटातील ६०० लोक, आणि ७९पेक्षा जास्त वय असलेले २६०० लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांची झोप आणि मेंदूचे आरोग्य यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या मध्यमवयीन व्यक्तींना आठवड्यातून एकदा दुःस्वप्न पडते, त्यांच्यातील विचार करण्याची क्षमता पुढील १० वर्षांत ४ पटीने वेगाने घटते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दुःस्वप्नांचा संबंध हा अनिद्रेशी आहे, त्यामुळे Dementia ला कारणीभूत असलेल्या प्रोटिनची निर्मिती होते.

"मेंदूतील पुढील भागात Neurodegeneration मुळे लोकांना स्वप्न पडत असताना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. यातून दुःस्वप्न येतात. हे जर टाळायचे असेल तर चांगला आहार, व्यायाम आवश्यक आहे. तसेच दारू आणि धुम्रपान अशी व्यसनं बंद केली पाहिजेत," असे मत संशोधक अबिदमी आय. ओटैकू यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news