shiva
shiva

Shiva : अन्यायाला तोंड फोडणारी, शिवा पाटील येतेय!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवा म्हणजे शिवानी पाटील! संघर्षनगर नावाच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय. कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे. शिवाच्या घरी आहेत तिची मोठी बहीण दिव्या, तिची आई आणि तिची आज्जी! (Shiva) वडिलांचं अकाली निधन झाल्याने या सगळ्यांची जबाबदारी शिवावर आहे, दिव्याचा स्वभाव शिवापेक्षा अतिशय वेगळाय, याच दिव्याचा फोटो बघून तिच्या प्रेमात पडतो तो आशु, आशुतोष देसाई! (Shiva)

संबंधित बातम्या –

कोट्याधीश आणि अतिशय संस्कारी कुटुंबातील मुलगा ! आशु आणि शिवाच स्वभाव एकदम विरुद्ध ! पण त्यांच्यात नकळत मैत्रीचं नात तयार होते, अशा या बिनधास्त आणि बेधडक शिवाला ती जशी आहे तशी हा समाज स्वीकारू शकेल का? जगदंब क्रिएशनने या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे. अभयसिह जाधव यांनी तर संवाद लेखक प्रल्हाद कुडतरकर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत स्वप्नील वारके. यात बिनधास्त शिवाची भूमिका साकारणार आहे पूर्वा कौशिक.

तिच्या सोबत प्रमुख भूमिकेत असतील शाल्व किंजवडेकर, समीर पाटील, मीरा वेलणकर आणि सविता मालपेकर हे कलाकार असतील. तर प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज असलेली बिनधास्त जगणारी "शिवा" येतेय १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news