Rishi Sunak : ऋषी सुनाक आहेत विराट कोहलीचे फॅन

Rishi Sunak : ऋषी सुनाक आहेत विराट कोहलीचे फॅन

Published on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय वंशाचे ऋषी सुनाक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. भारतासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे; पण सुनाक क्रिकेटचेदेखील मोठे चाहते आहेत. यापुढे जाऊन ते विराट कोहलीचे मोठे फॅन आहेत. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

मोकळ्या वेळात ते क्रिकेट खेळतात. खरे तर ते फिटनेससाठी क्रिकेट खेळतात. याशिवाय ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांना क्रिकेटचे सामने पाहायलादेखील आवडतात. इंग्लंडमध्ये शालेय शिक्षणादरम्यान ते स्वतः क्रिकेट खेळले आहेत.

विराट कोहली फेव्हरेट

ऋषी सुनाक हे फिटनेसवर खूप लक्ष केंद्रित करतात आणि त्यासाठीच ते क्रिकेट खेळतात. याशिवाय ते मोकळ्या वेळात सामने देखील पाहतात. खुद्द सुनाक यांनी 2018 मध्ये फेसबुक पोस्टमध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. निवडणूक प्रचारादरम्यानदेखील ते अनेकवेळा क्रिकेट खेळताना दिसले होते. त्यांचा आवडता खेळाडू विराट कोहलीदेखील आहे; पण 2019 मध्ये ब्रिटिश पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खासकरून जो रूटचे कौतुक केले होते.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news