Prarthana Behere : मराठी संस्कृतीत हे शोभत नाही, प्रार्थनाला सुनावले

prarthana behere
prarthana behere
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने मोनोकिनी घालून फोटोशूट केल्याने एकच चर्चा झालीय. (Prarthana Behere) तिने आतापर्यंत सर्वात बोल्ड फोटोशूट केल्याने ती चर्चेत आलीय. निळ्या-पांढऱ्या बोल्ड मोनोकिनीमध्ये प्रार्थनाने हे फोटोशूट केले आहे. पण, नेटकऱ्यांमध्ये कमेंट्सची जुगलबंदी सुरु आहे. प्रार्थनाने Happiness looks like this!!! ????? अशी कॅप्शन लिहित काही फोटो शेअर केले आहेत. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. (Prarthana Behere)

नेटकरी या फोटोंविषयी काय म्हणतात पाहुया…

एका सोशल मीडिया युजरने खूप सुंदर कमेंट केलीय. तो काय म्हणतो पाहा-"काही पुरुष मंडळी तिला संस्कृती जपण्याच सांगत आहेत जसा काय तिने एकटीने ठेकाच घेतलाय.स्विमिंग कॉस्च्युम घालून स्विमींग नाही करणार तर काय साडी घालून करणार काय.स्वता कधी घरातल्या देवा जवळ दिवा पण लावत नसतील ते तिला संस्कृती जपायला सांगत आहेत. जिन्स किंवा आधुनिक पेहराव घालायची आपली पण संस्कृती नाही म्हणून तुम्ही काय धोतर घालून फिरता का मुळात कोणाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये एवढं घुसायची गरजच काय? तिला संस्कृती चे डोस देण्या पेक्षा आपल्या बुडा खाली किती अंधार आहे हे पाहा आधी…"

या कमेंटनंतर अनेक नेटकऱ्यांमध्ये कमेंट्समध्ये प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काही जणांनी तिला खडे बोल सुनावले आहेत. ती एक गुणी अभिनेत्री आहे. तिने आपले असले फोटो टाकून किंमत कमी करून घेऊ नये, असे म्हटले आहे.

एका युजरने स्पष्ट कमेंट करत म्हटले आहे -"अस्या सौंदर्य व अंगावस्त्र मुळे आजकालच्या मुलीं खूपच वाया होत जात आहेत हो . प्रथम आधी कलाकारांनी आधी आपल्या सौंदर्या नीट सांभाळून ठेवा नंतर मग जगासमोर उभे रहा कळले का ?" सुंदरतेची व्याख्या फक्त नग्न फोटो असा ट्रेंड होतो का, असाही प्रश्न एकाने विचारला आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. प्रार्थना तु नेहा च्या look मध्ये जशी दिसते तशी छान दिसते, अशी कमेंट एकाने केलीय.

तर तिला काही जण म्हणतात-मराठी संस्कृतीत शोभत नाही असे फोटो ? टाकू नका, चुकीचा संदेश जातोय तुमच्या फोटो मधून ताई मराठी संस्कृतिला शोभत नाय हे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्ही मुले जो काही मुलींचा आदर करतो, असे मराठी मुलीचे चित्र बघून मुलींचा आदर करायची बिलकुल इच्छा होत नाही, प्रार्थना बेहेरे मॅडम… आपण एक मराठी सुसंस्कृत अभिनेती आहात… आपला रिस्पेक्ट आहे परंतु अशा वस्तूस्थितीतील फोटोज आपणास शोभा देत नाही स्वतःहून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका कारण ही आपली संस्कृती नाही… माफ करा.

शिवाय जे तिला संस्कृतीबद्दल बोलताहेत त्यांना एका चाहत्याने सुनावले आहे. "संस्कृतीबद्दल सांगणारे धोतर घालून फिरतात, असा प्रश्न विचारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news