

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅन्डचा डाव 179 धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीमध्ये नेदरलॅन्डकडून एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. त्यासह मॅक्स 42 आणि कोलिन एकरमनने 29 धावांची खेळी केली. याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मैदानावर फारकाळ टिकता आले नाही. नेदरलॅन्डचे चार फलंदाज धावबाद झाले. तर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. नबीसह नूर अहमदने 2 तर मुजीब अल रहमानने 1 विकेट घेतली. तर नेदरलॅन्डचे 4 फलंदाज धावबाद झाले. सामन्यात विजय मिळवण्यासाठी अफगाणिस्तानला 50 षटकात 180 धावांचे लक्ष्य आहे.
हेही वाचा