ODI World Cup : ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे गुणतालिका ‘जैसे थे’, जाणून घ्या पुढील समीकरण | पुढारी

ODI World Cup : ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे गुणतालिका 'जैसे थे', जाणून घ्या पुढील समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत आज (दि.२८) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ५ धावांनी पराभूत केले. ट्रायव्हस हेड आणि डेव्हिड वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांमध्ये सर्वबाद ३८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. पाठलाग करताना न्यूझीलंडने ५० षटकांमध्ये ९ विकेट गमावत ३८३ धावा केल्या. ( ODI World Cup 2023 )

ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रायव्हस हेड यांनी आजच्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली. ट्रायव्हस हेडने या सामन्यातून विश्वचषकात पदार्पण केले आणि 2023 विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावून विक्रम मोडला. (IND vs NZ World Cup)

गुणतालिकेत न्यूझीलंड तिसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्‍या सामन्‍यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी न्यूझीलंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. आज न्यूझीलंडने ऑस्टेलियाचा पराभव केला असता तर या संघाला दुसऱ्या स्थानी झेप घेता आली असती. मात्र, न्यूझीलंडचा संघ पराभूत झाल्याने गुणतालिकेत भारताची जैसे थे स्थिती आहे. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. (IND vs NZ World Cup)

श्रीलंकेला अजूनही संधी (IND vs NZ World Cup)

श्रीलंकेने आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून त्यापैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्‍या स्‍थानी आहे. दरम्यान, विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेला इथून पुढील सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड यांच्‍या पराभवाकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. तरच विश्वचषकाची उपांत्यफेरी श्रीलंकेला गाठता येणार आहे. सध्या गुणतालिकेत द. आफ्रिका आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. (IND vs NZ World Cup)

हेही वाचा :

Back to top button