

पुढारी ऑनलाईन: स्वतंत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी हिमाचल प्रदेशातील कल्पा या मूळ गावी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे, हिमाचल प्रदेशातील किन्नौरच्या डेप्युटी कमिश्नरांनी सांगितले आहे.
श्याम सरण नेगी यांच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शेवटचे मतदानाचे कर्तव्य बजावले होते. 12 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी शेवटचं मतदान केलं आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात नेगी यांनी 33 वेळा मतदान केले आहे.