NCP
Latest
राष्ट्रवादीकडून वर्धापन दिनानिमित्त टीझर रिलीज (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९ जून राेजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या रौप्य महोत्सवी पदार्पण वर्षाचा कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी (दि.९) केडगाव ( जि.अहमदनगर ) येथे हाेणार आहे. केडगाव येथे सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. (NCP)
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये शरद पवारांच्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. "रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी विचार भविष्यवादी" असे या व्हिडिओला देण्यात आले आहे. (NCP)
हेही वाचलंत का?
- ओडिशा रेल्वे अपघात : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली सीबीआय चौकशीची शिफारस
- पंतप्रधान मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य: कपिल पाटील
- ओबीसींना टाळून राजकारण होऊ शकत नाही : प्रफुल्ल पटेल; राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय ओबीसी कार्यकर्ता शिबिराचा समारोप
- Shashikant Shinde : तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे -फडणवीसांची युती तोडून दाखवतो: शशिकांत शिंदे यांचे आव्हान

