Horrific Thane Video | ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमधील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओचे विधानसभेत पडसाद

Horrific Thane Video | ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमधील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओचे विधानसभेत पडसाद
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रशिक्षणादरम्यान एनसीसी कॅडेट्सना एका व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडिओ (Horrific Thane Video) व्हायरल झाला. यावरुन खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठाण्यात प्रशिक्षण सत्रादरम्यान एनसीसी कॅडेट्सना एका व्यक्तीने मारहाण केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तर रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (NCC Students Thane Viral Video)

NCC Students Thane Viral Video : काय आहे प्रकरण?

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि व्हीपीएम पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. मात्र शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून चूक झाल्याने त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सात ते आठ ज्युनियर विद्यार्थ्यांना चिखलाच्या पाण्यात खाली डोके टेकून उभे केले आहे. त्यानंतर त्यांच्या पाठीवर एक विद्यार्थी लाकडी दांड्याने अमानुषपणे मारत असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे. (NCC Students Thane Viral Video)

असे प्रकार  होऊ नयेत म्हणून एका कमिटीची स्थापना

गुरुवारी (दि.३) या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असे प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एका कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून नये. आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये."

व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिक्षक नाही : प्राचार्या सुचित्रा नाईक

ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रशिक्षणादरम्यान एनसीसी कॅडेट्सना एका व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरुन खळबळ उडाली. याबाबत जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक  यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,"विद्यार्थ्यांना मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिक्षक नाही. आम्ही अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी याचा सामना केला त्यांनी घाबरू नये,". (NCC Students Thane Viral Video)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news