

पुढारी ऑनलाईन : नवाजुद्दीन सिद्दिकी ( Nawazuddin Siddiqui ) हा बॉलीवूडमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सध्या त्याच्या 'हड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. तो लूक पाहून त्याला ओळखणेही कठीण झाले होते. पण, आता त्याने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Nawazuddin Siddiqui सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. आता त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो 'हड्डी' या त्याच्या आगामी चित्रपटातील आहे. या फोटोतून त्याचा एक वेगळा अंदाज समोर आला आहे. मात्र, या फोटोची कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने स्त्री वेशातील एक फोटो पोस्ट केला. या फोटोत त्याने लाल साडी नेसली असून लांब कानातले, मोठा नेकलेस घातला आहे. तसेच लाल रंगाची टिकली, ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे. गिरफ्तार तेरी आँखो में हुये जा रहे हैं हम, जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं, फिर भी जिये जा रहे हैं हम ! हम, अशी त्याने कॅप्शन दिली आहे.
हेही वाचलंत का?