Pathaan : लूकसाठी शाहरूखने केले लाखो खर्च | पुढारी

Pathaan : लूकसाठी शाहरूखने केले लाखो खर्च

पुढारी ऑनलाईन : ‘ पठाण’ ( Pathaan ) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून रोज नवा वाद समोर येत आहे. गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून सोशल मीडियावर नेटकरी दोन गटांत विभागले गेले आहेत. काही जण या गाण्यातील दृश्यांविरोधात आहेत, तर काहींनी हा वाद विनाकारण घातला जात असल्याचे म्हटले आहे. या गाण्यात शाहरुखच्या लूकवर किती पैसे खर्च केले, त्याचा आकडा समोर आला आहे.

Pathaan च्या एका दृश्यासाठी शाहरूखच्या लूकवर बकळ पैसा खर्च केला आहे. सीनमध्ये शाहरूखने ८ लाख १९ हजार ४८३ रुपयांचा शर्ट घातला आहे. काळ्या रंगाचा हा फ्लोरल प्रिंटचा शर्ट ऑलसेंटस् या ब्रँडचा आहे. हा शर्ट तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो; मात्र गाणे प्रदर्शित होताच तो आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. या सीनमध्ये शाहरूखने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले आहेत. या स्नीकर्सची किंमत एक लाख १० हजार ६७७ रुपये आहे. या लूकला साजेसे असे सनग्लासेससुद्धा त्याने घातले आहेत. या सनग्लासेसची किंमत सुमारे ४१ हजार २१० रुपये आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button