हिंडनबर्गनं Adani यांना पुन्हा घेरलं! स्विस बँकेतील ३१ कोटी डॉलर रक्कम गोठवली

Hindenburg Vs Adani : अदानी समूहाने हिंडनबर्गचे आरोप फेटाळले
हिंडनबर्गनं Adani यांना पुन्हा घेरलं! स्विस बँकेतील ३१ कोटी डॉलर रक्कम गोठवली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अदानी समुहाबाबत (Adani Group) अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गने (US short seller Hindenburg) आणखी एक मोठा दावा केला आहे. यामुळे खळबळ‍ उडाली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी अदानी समूहाशी संबंधित मनी लाँडरिंग आणि सिक्युरिटीज फसवणूक आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस बँक खात्यांमधील ३१ कोटी डॉलरहून अधिक (३१० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त) रक्कम गोठवली आहे, असा दावा हिंडनबर्गने केला आहे. याबाबतची चौकशी २०२१ च्या सुरुवातीला सुरु करण्यात आली होती. दरम्यान, अदानी समूहाने हिंडनबर्गचे आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आहेत.

हिंडनबर्गने पोस्टमध्ये काय आरोप केलेत?

हिंडनबर्गने गुरुवारी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०२१ पासून सुरु असलेल्या चौकशीने भारतीय समूहाशी संबंधित अपारदर्शक ऑफशोर संस्थांचा समावेश असलेल्या आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकला आहे. स्विस फौजदारी न्यायालयाच्या नोंदीतील तपशील असे दर्शवतो की, अदानींनी पारदर्शक नसलेल्या बीव्हीआय/मॉरिशस आणि बर्म्युडा फंडामध्ये गुंतवणूक कशी केली? ज्यात केवळ अदानी स्टॉकची मालकी आहे, असे हिंडनबर्गने स्विस मीडिया आउटलेटचा (Swiss media outlets) हवाला देत पोस्टमध्ये म्हटले आहे.

जिनिव्हा सरकारी वकील कार्यालयाकडूनही अदानी समुहाची चौकशी?

स्विस मीडियाच्या वृत्तानुसार, हिंडनबर्ग रिसर्चने पहिल्यांदा आरोप करण्यापूर्वी जिनिव्हा सरकारी वकील कार्यालय अदानी समुहाच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करत होते. अब्जाधीश गौतम अदानी यांची पाच स्विस बँकांमधील ३१० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली आहे, असे पुढे वृत्तात म्हटले आहे.

Hindenburg Vs Adani : अदानी समूहाने आरोप फेटाळले, म्हणाले...

अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "आमच्यावर केलेले निराधार आरोप निःसंदिग्धपणे आम्ही फेटाळतो. अदानी समूहाचा स्विस न्यायालयाच्या कोणत्याही खटल्यात सहभाग नाही. आमच्या कंपनीची कोणतीही खाती कोणत्याही प्राधिकरणाने जप्त केलेली नाहीत." असे अदानी समुहाने म्हटले आहे.

हिंडनबर्गनं Adani यांना पुन्हा घेरलं! स्विस बँकेतील ३१ कोटी डॉलर रक्कम गोठवली
‘अदानी’ महाराष्ट्रात बनवणार सेमीकंडक्टर! 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news