‘अदानी’ महाराष्ट्रात बनवणार सेमीकंडक्टर! 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

इस्रायली कंपनीसोबत करार, शिंदे सरकारची प्रकल्पाला मान्यता
adani group semiconductor
अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. File Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या चार मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी समूहाने संयुक्तपणे स्थापन केलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे उभारल्या जाणाऱ्या या सेमीकंडक्टर प्लांटमध्ये एकूण 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘इस्रायलची टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाच्या सहकार्याने ॲनालॉग आणि मिश्रित-सिग्नल इंटिग्रेटेड सर्किट्स तयार करण्यासाठी रयगड जिल्ह्यातील पनवेल येथे प्लांट उभारण्यात येणार आहे. गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात 58,763 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 25,184 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.’

रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकूण 84,947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 5,000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. उपसमितीने दोन इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मिती प्रकल्प आणि एका वस्त्रोद्योग प्रकल्पालाही मान्यता दिली. सप्टेंबर 2022 मध्ये वेदांत-फॉक्सकॉनने पुण्याजवळील तळेगाव फेज चार (IV) येथील सेमीकंडक्टर प्लांटमधील 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रद्द केल्यानंतर दोन वर्षांनी ही मोठी घोषणा झाली आहे.

29,000 नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित

पनवेल, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात पसरलेल्या या चार प्रकल्पांतून 29,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे सरकारी पत्रकात म्हटले आहे. सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूह संयुक्तपणे पनवेल (जि. रायगड) येथे सेमीकंडक्टर उत्पादनाचा एक मेगा प्रकल्प सुरू करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 58,763 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 25184 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. म्हणजे एकूण 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि 15,000 लोकांना रोजगार मिळेल.

ईव्ही उत्पादन सुविधा

सेमीकंडक्टर प्रकल्पाव्यतिरिक्त, उपसमितीने पुण्यात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीने 12,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन ईव्ही उत्पादन सुविधा आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली. 21,273 कोटींच्या गुंतवणुकीसह योजनेला मंजुरी दिली. दोन प्लांट्समधून अनुक्रमे 1,000 आणि 12,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

वस्त्रोद्योगाला मिळणार

सरकराकडून असेही सांगण्यात आले आहे की, रेमंड लग्झरी कॉटन्स कंपनीकडून अमरावतीच्या नंदगांवकर पेठ येथे 188 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. सूत कताई, सूत रंगवणे, ताग आणि कापूस विणण्याची सुविधा विकसित करण्यासाठीचा हा प्रकल्प असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news