यूट्यूबवरील कमाईतून तरुणाने घेतली ऑडी

यूट्यूबवरील कमाईतून तरुणाने घेतली ऑडी

Published on

नवी दिल्ली :  सध्या प्रत्येकाच्या हातात अत्याधुनिक मोबाईल आहेत आणि त्यावर ते फावल्या वेळात यूट्यूबवरील व्हिडीओ बघत असतात. मोबाईलधारकांच्या या सवयीने यूट्यूबवर वेगवेगळे मनोरंजक व्हिडीओ बनवणार्‍या एका तरुणाला करोडपती बनवले असून, त्याने या पैशांतून चक्क 50 लाखांची ऑडी कार खरेदी केली आहे. हर्ष राजपूत असे त्याचे नाव असून, तो बिहारमधील जसोईया गावचा आहे.

सोशल मीडिया हा बहुतेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेक जण सोशल मीडियावर सातत्याने विविध गोष्टी सर्च करण्याबरोबरच पोस्टही करत असतात. काहीजण मनोरंजन करणारे, एखादी माहिती देणारे, आरोग्याबाबत काळजी कशी घ्यावी, अशा अनेक बाबींवरील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर टाकत असतात. हे व्हिडीओ पाहणार्‍यांच्या संख्येने एक विशिष्ट टप्पा गाठला की, व्हिडीओ बनवणार्‍याची कमाई सुरू होते. बिहारमधील हर्षनेही एक चॅनेल बनवून त्यावर मनोरंजक व्हिडीओ अपलोड केले. सध्या त्याच्या फॉलोअर्सची संख्या 33 लाखांपेक्षा अधिक असून, त्यामुळे त्याची महिन्याची कमाई 8 लाखांपर्यंत गेली आहे. या कमाईतून त्याने 50 लाखांची ऑडी कार खरेदी केली आहे. त्याचा एक व्हिडीओ 20 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news