मुसेवाला हत्येप्रकरणी तिघांना अटक

मुसेवाला हत्येप्रकरणी तिघांना अटक

नवी दिल्ली : पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तिघा आरोपींकडून अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, आठ हाय एक्सप्लोसिव्ह ग्रेनेड, नऊ इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर, एक असॉल्ट रायफल, तीन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे अशी घातक सामुग्री जप्‍त करण्यात आली आहे.

यातील ग्रेनेड लाँचर एके 47 रायफलवर लावता येऊ शकते. सहा शार्प शूटर्सची ओळख निश्‍चित केली असून हे दोन मॉड्युलचे सदस्य आहेत. या सर्वांचा थेट संबंध अंडरवर्ल्ड डॉन गोल्डी बरार याच्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनप्रीत मन्‍नू नावाच्या शूटरने मुसेवालावर पहिली गोळी झाडली. त्यानंतर इतर शार्प शूटर्सनी गोळीबार केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news