जम्मू; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरातील अनंतनागमध्ये सोमवारी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन लष्करी जवान जखमी झाले. यावेळी लष्कराच्या चिनार कॉर्पसमधील झूम नावाचा श्वानही जखमी झाला. गोळी लागली असतानाही झूम दहशतवाद्यांबरोबर लढत राहिला. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारी लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू होते.
या ऑपरेशनमध्ये झूमही सहभागी झाला होता. दहशतवादी लपून बसले असलेल्यांत घरात जवानांनी झूमला पाठवले. झुमने दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी झूमला दोन गोळ्या लागल्या. जखमी होऊनदेखीलही तो दहशतवद्यांशी लढत राहिला. झूम हा उच्च प्रशिक्षित आणि धोकादायक श्वान आहे.